Home प्रशासन नगरपालिका भुसावळ नगरपालिकेची उद्या अर्थसंकल्पीय सभा

भुसावळ नगरपालिकेची उद्या अर्थसंकल्पीय सभा

0
42

भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेची २६ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन सभा होणार असून यात अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

भुसावळ नगरपालिकेच्या अर्थसंकल्पनीय सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही सभा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा जमा-खर्च व अंदाजपत्रक मंजुरीसाठी व्हीसीद्वारे होणार आहे. त्यात २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीच्या विकास कामांवर तरतूद होईल.नगरसेवक व्हीसीद्वारे बैठकीत आपले मत मांडू शकतील.

याआधी झालेल्या सभेत विरोधी नगरसेवक सहभागी झाले नव्हते. तसेच त्यांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. यामुळे आता उद्याच्या सभेत तरी विरोधक सहभागी होणार का ? याची शहरवासियांना उत्सुकता आहे.


Protected Content

Play sound