अनिल पगारियाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्यातील संशयित अनिल रमेशचंद पगारिया याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

याबाबत वृत्त असे की, बीएचआर घोटाळ्यातील पावती एजंट म्हणून काम करणार्‍या अनिल रमेशचंद पगारीया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुण्यातील डेक्कन, शिक्रापुर व आळंदी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. याच गुन्ह्यात अनिल पगारीया याने अटकपूर्व जामीन मागणीतला होता. त्यावर न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

या प्रकरणी झालेल्या सुनावणीत अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी सरकारी बाजू मांडली. त्यांनी पगारिया याने जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, महावीर जैन, विवेक ठाकरे यांच्यासोबत संगनमत करुन अनेक ठेवीदारांची दिशाभूल केली. ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग करुन देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. ३० टक्के रक्कम ठेऊन घेत ठेवीदारांना ठेवणीतील ७० टक्के पैसे परत करण्याचे काम त्याने केले आहे. त्यामुळे बीएचआरचा ठेवीदारांचे नुकसान झाले. तर कर्जदारांना बेकायदेशीरपणे लाभ मिळवून दिला आहे. असा युक्तीवाद सरकारी वकील प्रवीण चव्हाण व त्रयस्त अर्जदार अ‍ॅड. अक्षता नायक यांनी केला. यानंतर न्यायालयाने पगारीया याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

Protected Content