आशाबाबा नगरात विना परवानगी वाजणारा डी.जे. जप्त; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आशाबाबा नगर येथे हळदीच्या कार्यक्रमात विनापरवानगी वाजणार्‍या डीजेवर रामानंदगनर पोलिसांनी कारवाई केली असून डीजे जप्त केला आहे. 

दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर ५० पेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी करु या आदेशाचे उल्लंघन केल्याने लग्नाचे आयोजक बापूराव श्रावण पाटील रा. आशाबाबानगर तसेच डीजे मालक शालीक देवीदास कोळी रा. हिंगोणे सिम जळोद ता.अमळनेर याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ रोजी मध्यरात्री रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी, चालक वासुदेव मोरे, पोलीस कॉन्स्टेबल रेवानंद साळुंखे हे गस्तीवर होते. यादरम्यान आशाबाबा नगर येथे गस्त घालत असतांना बापूराव श्रावण पाटील यांच्या घरासमोर लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरु होता. तसेच या ठिकाणी (एम.एच. ४३ ए.डी.१७५) या क्रमांकाचे वाहन असलेला डीजे वाजत होता. त्याच्याकडे परवानगी नसल्याचे दिसून आले. तसेच जिल्हाधिकारी यांचे ५० पेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी करु नये असे आदेश असतांनाही याठिकाणी १०० ते १५० लोक गर्दी करुन नाचतांना दिसून आले. जिल्हाधिकार्‍याचे आदेश उल्लंघन तसेच विनापरवानी डीजे वाजविल्याप्रकरणी पोली कॉन्स्टेबल विनोद सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात लग्नाचे आयोजक बापूराव श्रावण पाटील रा. आशाबाबानगर व डी.जे मालक शालीक देवीदास कोळी रा. हिंगोणे सीम जळोद ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी डीजेवर कारवाई करुन संबंधित डीजे पोलीस ठाण्यात जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ललीत भदाणे करीत आहेत.

Protected Content