यावल प्रतिनिधी । तालुक्यातील परसाडे गावात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की करूणा बाळासाहेब भालेराव (वय १४ वर्ष) असे मृत मुलीचे नाव असून ती इयत्ता ८वी शिकत होती. परसाडे येथे आपली आजी आणी वडीलांसोबत राहात होती व तिची आई ही आपल्या माहेरी राहात आहे. करूणा हिने आज दि.१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ते ६ :३० वाजेच्या सुमारास आजी घराबाहेर बसली असता आपल्या राहत्या घरातील छताला गळफास घेवुन आत्महत्याचा प्रयत्न केले मात्र तिला तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर चौधरी यांनी तिला मृत घोषीत केले असुन, तिचे शवविच्छेदन डॉ. मयुर चौधरी यांनी केले. याबाबत अशोक शंकर भालेराव यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अस्लम खान हे करीत आहे.