रावेर : प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीला बऱ्याच वर्षानंतर कासवगतीने चालणा-या प्रशासनाला गती देण्यासाठी कुशल प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल लाभल्या आहेत
. तक्रारीचे निवारण असो की. शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचा विषय असो ; कोतवाल यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
सौ दिपाली कोतवाल रावेर पंचायत समितीला पाच महिन्यांपूर्वी लाभलेल्या बीडीओ. अतिशय शांत स्वभावाच्या व कुशल प्रशासन चालवणा-या सौ कोतवाल यांनी कमी-कालावधित रावेर तालुक्यातील बऱ्याच गावांना भेटी दिल्या आहेत .रावेर पंचायत समितीत ग्रामीण भागातुन तक्रार घेऊन आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारीचे निवारण स्वता:च करतात तक्रार आली तर स्वता: मुळापर्यंत निवारण करतात
कासव गतीने चालणा-या पंचायत समितीला गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल आल्यापासुन बरीच गती मिळाली आहे.कोरोना काळात देखिल ग्रामीण भागाची कामगिरी चांगली राहीली आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या घरकुल व शौचालय यावर विशेष लक्ष देऊन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल आढावा घेत असतात. कर्मचा-यांकडून कामे वेळेत करून घेतात
बीडीओ दिपाली कोतवाल यांचे भूमिहीन गरीब कुटुंब, अपूर्ण घरकुले व शौचालय नसलेले कुटुंब यांच्यावर खास लक्ष असते कोरोनाकाळातदेखिल पंचायत समिती प्रशासनाची कामगिरी चांगली राहिली आहे.