Home Cities अमळनेर अमळनेरात धुमस्टाईल महिलेची सोन्याची मंगलपोत लंपास; पोलीसात गुन्हा

अमळनेरात धुमस्टाईल महिलेची सोन्याची मंगलपोत लंपास; पोलीसात गुन्हा

chain snatching

अमळनेर प्रतिनिधी । रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि मंगळसुत्र अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवरून येवून तोडून लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सिंधूबाई माधव सोनवणे (वय-५५) रा. आनंदनगर, पिंपळे रोड अमळनेर ह्या ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील सुमन क्लासेस समोरून पायी जात असतांना मागून अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवरून येवून त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रूपये किंमतीची सोन्याची मणी मंगळसुत्र पोत हिसकावून दुचाकीवरून फरार झाले. महिलेने आरडाओरड केली  तोपर्यंत दुचाकीस्वार फरार झाले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि विवेक पाडवी करीत आहे. 


Protected Content

Play sound