व्यापाऱ्याची ८६ हजारात ऑनलाईन फसवणूक; मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील हलखेडा येथे औषधीची काळी हळद देत असल्याचे बहाणा करून एकाची ८६ हजाराची फसवणूक करून मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, साकीर अहमद हासीन आमलीवाला (वय-४५) रा. वालाड जि. तापी (गुजरात) एक चालक असून व्यवसायही करतात. तालुक्यातील कुऱ्हा येथील शुभम संजय पाटील यांनी औषधीसाठी लागणारी काळी हळद देतो असे सांगून साकीर यांच्या गुगल पे वरून ८६ हजार ३०० रूपये मागवून घेतले. दरम्यान औषधाची हळद दिली नाही याचा जाब विचारला असता टाळाटाळ करत होते. दरम्यान, पैसे परत मागितले असता साकीर यांना शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी मुक्ताइनगर पोलीस ठाण्यात शुभम पाटील याच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि साळुंखे करीत आहे. 

Protected Content