
यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील राहणारे प्रगतिशील शेतकरी प्रेमचंद रामदास महाजन उर्फ गजानन यांचा आज स्वतःच्या मालकीच्या शेतातील विहिरीत पाण्याची पातळी पहात असताना पाय घसरून तोल जावुन विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील दहिगाव येथील राहणारे प्रगतिशील शेतकरी प्रेमचंद रामदास महाजन उर्फ गजानन यांचा आज दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजे चे दरम्यान दहीगाव शिवारातील साखरी रस्त्यावर असलेल्या त्यांचे स्वतःच्या मालकीच्या शेतातील विहिरीत पाण्याची पातळी पहात असताना पाय घसरून तोल जावुन विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
याबाबतच्या घटनेची खबर महेंद्र दिनकर महाजन यांनी पोलिसात दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी शेख असलम शेख व सहकारी करीत आहेत. दृदैवीरित्या मरण पावलेल्या प्रेमचंद महाजन यांचे पश्चात आई पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे


