Home Cities अमळनेर हिंगोणे बु. च्या लोकनियुक्त सरपंचपदी केदारसिंग राजपूत विजयी

हिंगोणे बु. च्या लोकनियुक्त सरपंचपदी केदारसिंग राजपूत विजयी


 

 

 

 

bec12c8f 1a32 4f96 859d cdbfa5d7676f

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे बु. ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी आ. शिरीष चौधरी मित्र परिवाराचे केदारसिंग कोमलसिंग राजपूत यांनी शानदार विजयमिळवला असून यानिमित्ताने तालुक्यात सर्वाधिक तरुण लोकनियुक्त सरपंच म्हणूनही मोठा बहुमान मिळविला आहे. विशेष म्हणजे या तरुण सरपंचाची प्रचंड मताधिक्याने निवड झाली आहे.

तसेच ग्रामपंचायत सदस्यपदी आ. शिरीष चौधरी मित्र परिवाराचे सौ. अर्चना महेंद्रसिंग पाटील, सौ. दयाबाई सिताराम भिल, सौ. योगिता उदयसिंग भिल, तानकु बुधा भिल हे प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचा सत्कार आमदार चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. गावाने आपल्या मित्रपरिवार आघाडीसह नवं तरुणास पसंती दिल्याने हिंगोणे बु गावाच्या विकासासाठी आपण सदैव तप्तर राहू असे आश्वासन आ. चौधरी यांनी यावेळी दिले. याप्रसंगी माजी सरपंच बापू रावण भिल, हरेशकुमार पाटील, भगवान पाटील, लक्ष्मण पाटील, राजेंद्र पाटील, रमेश पाटील, कल्याण सिंह पाटील, प्रभाकर पाटील, जितेंद्र पाटील, रणजित पाटील, उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound