Home धर्म-समाज पाचोरा येथे एम. एम. महाविद्यालयात निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण

पाचोरा येथे एम. एम. महाविद्यालयात निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण

0
33

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे राज्य उपाध्यक्ष कमलेश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पाचोरा तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयाच्या १०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला.

निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यकमात प्रत्येक स्पर्धेतील प्रथम पाच व दोन उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. राज्य उपाध्यक्ष कमलेश सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी तर आभार प्रणव जाधव यांनी मानले. प्रा. स्वप्नील भोसले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, प्रमुख मार्गदर्शक डॉ. संजय माळी, युवा परिषदेचे राज्य उपाध्यक्ष कमलेश सोनवणे, तालुका कोषाध्यक्ष रामा जठार, पाचोरा इस्कॉनचे प्रमुख प्रभुजी जगन्नाथ यात्रा दास यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुणाल पाटील, क्षितीज सोनजे यांनी मेहनत घेतली.


Protected Content

Play sound