जळगाव (प्रतिनिधी) औरंगाबाद खंडपीठात कार्यरत असलेले ज्येष्ठ विधिज्ञ एन.बी. सूर्यवंशी यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश रंजन गोगोई, न्या.एस.ए. बोबडे व न्या.एस.व्ही. रामना यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केलेल्या १० जणांमध्ये पाच जण ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. त्यात नितीन सूर्यवंशी यांच्यासह अविनाश घरोटे, माधव जामदार, अनिल किलोर व मिलिंद जाधव यांचा समावेश आहे.