जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भोकर येथील माहेर तर नरडाणा धुळे येथील सासर असलेल्या विवाहितेला १ लाखासाठी छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, संगीता विजय वडर (वय-२२) रा. नरडाणा ता. शिंदखेडा जि.धुळे ह.मु. भोकर ता. जि.जळगाव यांचे चार वर्षांपूर्वी विजय शिवाजी वडर रा. नरडाणा ता. शिंदखेडा जि.धुळे यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर सुरूवातीचे तीन महिने चांगले गेले. त्यानंतर पती विजय वडर यांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दुचाकीसाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे यासाठी सासरे शिवाजी देवरा वडर, रूपाबाई शिवाजी वडर, जेठ दगडू शिवाजी वडर, दिर नितेश शिवाजी वडर सर्व रा. नरडाणा ता. शिंदखेडा जि.धुळे यांनी छळ केला. हा छळ असहाय्य झाल्याने विवाहिता भोकर ता. जळगाव येथे माहेरी निघून आल्यात. आईवडीलांना घडलेली हकीकत सांगितली. आईवडीलांनी धीर दिला. विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिनेश पाटील करीत आहे.