जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळराम पेठेतील अखिल भारतीय ब्रम्हमहाशिखर तर्फे आज गोलमेज परिषद घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
ब्राम्हण सभेत विविध मागण्यांसाठी शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा, पुरोहितांना मानधन, समाज बांधवांकडे असलेल्या वर्ग दोनच्या जमीनींचा विचार व्हावा, महापुरूषांची बदनामी होणाऱ्या समाज कंटकांवर गुन्हा दाखल होण्यासाठी एक स्वतंत्र कायदा अस्तीत्वात आणावा, स्वातंत्रविर विनायक दमोदर सावरकर यांना भारतरत्न मिळावा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे तयार होत असलेले स्मारक लवकरात लवकर पुर्ण करून देशासाठी अर्पण करावे, श्रीमंत बाजीराव पेशवे यांची श्रीवर्धे येथे भव्य स्मारक उभारावा, जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह असावा, भगवान परशूराम यांचे भव्य मंदीर उभारण्यासाठी जळगाव शहरात चार ते पाच एकर जमीन महापालिकेने द्यावी. या मागण्यांसाठी आमदार राजूमामा भोळे आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय ब्रम्हमहाशिखर संस्थापक सदस्य योगेश कुळकर्णी यांच्यासह आदींनी दिली आहे.
यासंदर्भातआहे. यावेळी महाराष्ट्रातील पदाधिकारी व समाजातील प्रत्येक संस्थेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी पुढेही अशीच गोलमेज परिषद घेण्यात यावी असा सुर उपस्थित मान्यवरांनी काढला.
https://www.facebook.com/508992935887325/videos/2551061171861348