ब्रिस्बेन : वृत्तसंस्था । रिषभ पंतने केलेल्या तडाखेदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने रंगतदार झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने २–१ च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे.
विशेष म्हणजे टीम इंडियाचा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सलग तिसरा म्हणजेच हॅटट्रिक मालिका विजय ठरला आहे. टीम इंडियाकडून शुभमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने निर्णायक क्षणी फटकेबाजी करत म्हत्वाची भूमिका बजावली. पंतने निर्णायक ८९ धावांची नाबाद खेळी केली.
ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली. या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने फंलदाजीला सुरुवात केली. मार्क्स स्टोयनिस आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने ८९ धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी शार्दुल ठाकूरने मोडीत काढली. यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना ठराविक अंतराने धक्के दिले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथने ५५ धावांची खेळी केली. तर वॉर्नरने ४८ धावा केल्या.
याव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना मोठी खेळी करण्यापासून रोखले. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर बॅटिंगने कमाल केल्यानंतर शार्दुलने बोलिंगनेही धमाल केली. शार्दुलने ४ विकेट्स घेतल्या. तर नटराजनने १ विकेट घेतली.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने एकूण ३३६ धावा केल्या. टीम इंडियाच्या पहिल्या डावातील फलंदाजीला सुरुवात झाली. पहिल्या डावात टीम इंडियाच्या टॉपच्या फलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. ऑस्ट्रेलियाला १०० पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळण्याची शक्यता होती.
१८६–६ अशी टीम इंडियाची स्थिती झाली. मात्र यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर या जोडीने सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांच्या खेळीमुळे टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद ३३६ धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला ३३ धावांचीच आघाडी मिळाली. शार्दूल ठाकूरने ६७ तर सुंदरने ६२ धावा केल्या. तसेच सलामीवीर रोहित शर्माने ४४ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने १ विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने १०८ धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार टीम पेनने ५० धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही फलंदाजाला फार होत खोलू दिले नाही. टीम इंडियाकडून पहिल्या डावात थंगारासू नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंजर या तिकडीने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने एका फलंदाजाला माघारी धाडलं.