Home Cities भुसावळ जि.प. सदस्या पल्लवी सावकारेंचे नाव मतदार यादीतून गायब

जि.प. सदस्या पल्लवी सावकारेंचे नाव मतदार यादीतून गायब

0
82


भुसावळ प्रतिनिधी । कुर्‍हा-वराडसीम गटातील भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. पल्लवी प्रमोद सावकारे यांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

सौ. पल्लवी प्रमोद सावकारे यांचे नाव ग्रामीण भागात असून त्या येथेच मतदान करतात. मात्र आता निवडणुकीच्या यादीतून त्यांचे नाव गायब झाल्याचे दिसून आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या एक दिवस आधी हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

विशेष बाब म्हणजे मतदारांच्या अंतीम याद्या तयार झाल्या त्यावेळी त्यांचे नाव यादीत होते. मात्र, आता त्यांचे नाव मतदार यादीत नाही. याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे.


Protected Content

Play sound