Home क्राईम चाळीसगावात विवाहितेचा विनयभंग; एकावर गुन्हा

चाळीसगावात विवाहितेचा विनयभंग; एकावर गुन्हा


चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील ४२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून एकावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील ४५ वर्षीय विवाहिता ही आपल्या पतीसह शहरातील एका लग्नाच्या कार्यक्रमास गेले असता संशयित आरोपी अविनाश वसंत सिसोदे (वय-५२) रा. हायझर अपार्टमेंट कॉलेज रोड नाशिक याने लग्नाच्या ठिकाणी येवून विवाहिता यांच्याकडून इ-थ्री नावाचे फ्रेचांयशी कोर्सच्या नावाखाली घेतलेले सात लाख रूपये देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने विवाहितेच्या पतीशी भांडण केले, व विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अविनाश सिसोदे याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार धर्मराज पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound