औरंगाबाद – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
यावेळी साहित्य महामंडळाच्या स्थळनिवड समितीने नाशिक येथील एकाच संख्येला निमंत्रण पाहणीसाठी निवडले आणि त्याला भेट देऊन आवश्यक ती पाहणी केली आणि आपला अहलवाल महामंडळाला दिला, असे कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. साहित्य महामंडळाने स्थळनिवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केली आहे, असे कौतिकराव ठाले पाटील म्हणाले.