Home राजकीय काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर ?

काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर ?

0
33

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पक्षाचे आमदार सुभाष झांबड यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नाराज आहेत. यामुळे त्यांनी कालच स्वत: अपक्ष लढविण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर त्यांनी काल रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याप्रसंगी जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता यातून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound