जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये गोदावरी ग्रुपमध्ये शिकणार्या तीन विद्यार्थ्यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या तिघांचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, जळगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये नारसिंग वसावे, संजना गोपवाड आणि शांति पावरा यांची ग्राम पंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. शिकत असतांनाच त्यांनी ग्रामपंचायतीत अविरोध निवडून जाण्याची कामगिरी पार पाडली आहे.
दरम्यान, ही निवड निश्चीत झाल्यानंतर या तिन्ही विद्यार्थ्यांनी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी डॉ. पाटील यानी राजकीय मंत्र देतांना सदस्य म्हणून विकासाचा दृष्टिकोन ठेवा. माहिती घेऊन गावाचा विकास करा असे सांगितले.
या वेळी युवा नेत्या डॉ. केतकी, डॉ. वैभव पाटील यांची उपस्थिती होती. नारसिंग वसावे, संजना गोपवाड आणि शांति पावरा या तिन्ही विद्यार्थ्यांना विकासाभिमुख वाटचाल करण्याची ग्वाही दिली आहे.