कोरोनाच्या  नवीन विषाणूचा प्रकोप ;  इंग्लडमध्ये मार्चपर्यंत लॉकडाऊन

 

लंडन वृत्तसेवा इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सोमवारी रात्री जनतेला संबोधित करतांना कोरोनाच्या नव्या प्रकारचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सक्तीचा लॉकडाऊन लागू करीत असल्याचे जाहीर केले.

बोरीस जॉन्सन यांनी सांगितले की, कोरोना संकट पाहता बुधवारी ६ जानेवारी ते मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारण, वैद्यकीय कारणं, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि कौटुंबिक हिंसेतून मदत मागण्यासाठीच्या कारणानेच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना असेल असे त्यांनी नमूद केलं. इंग्लंडमधील शाळा, माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय यांच्यावर ही या लॉकडाऊनचा थेट परिणाम होणार आहे. तसेच खुल्या क्रीडा प्रकारांवर ही यादरम्यान बंदी आणली गेली आहे. नागरिकांनी किमान लसीकरण सुसूत्रतेने सुरू होईपर्यंत तरी कमलीची सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे आवाहन बेरीज जॉन्सन यांनी केले. त्याचप्रमाणे जुन्या विषाणूची दिलेली झुंज यशस्वी होताना दिसत होती पण आता या विषाणूच्या एका नव्या प्रकारची माहिती मिळाली आहे. या विषाणूचा संसर्ग वेग हा अतिशय तणावपूर्वक आणि सतर्क करणार आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Protected Content