जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कास्ट्राईब दिनदर्शिका सन २०२१ प्रकाशन व कोरोना योद्धा गौरव समारंभाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात करण्यात आले.
कार्यक्रमाचा प्रारंभ स्त्री शिक्षणाच्या जननी, भारतातील प्रथम महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका स्फुर्तीनायिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेश अभिवादन करून करण्यात आले. यात उद्घाटन राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सचिव आर. बी. रोझोदकर, केंद्रीय कोषाध्यक्ष प्रदीप जोशी, विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, राज्य संघटक बी. डी. बोदडे, विजय मेढे, गस संचालक उदय पाटील सुनील सूर्यवंशी, सूर्यकिरण बिऱ्हाडे, रविद्र सोनवणे आदी उपस्थित होते. कास्ट्राईब जिल्हाध्यक्ष सुनील सोनवणे यांनी प्रास्तविक तर बी.एन. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. याश्वितेसाठी शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष संदीप केदारे, जिल्हा परिषद संघटना जिल्हाध्यक्ष आर. टी. सोनवणे, आरोग्य संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र पालवे आदींनी कामकाज पाहिले
https://www.facebook.com/508992935887325/videos/443138860402401