कोरोनाच्या उत्पत्तीची माहिती जगासमोर आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना चीन देतोय त्रास

 

बीजिंग : वृत्तसंस्था| कोरोना संदर्भात संशोधन करण्यासाठी या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या संशोधनामध्ये चीन राजकीय स्वार्थ जपण्यासाठी अडथळे निर्माण करत असल्याचा दावा गोपनीय कागपत्रांच्या अधारे केला जात आहे.

दक्षिण चीनमधील घनदाट जंगलांमध्ये काही कोळश्याच्या खाणी असून येथे मोठ्या संख्येने वटवाघुळं राहतात. याच वटवाघुळांमुळे सर्वात आधी मानवाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे मानले जाते. करोना विषाणूचा उगम कुठून झाला याच्या संशोधनामध्ये या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्व आहे. या ठिकाणी कोरोना विषाणूची उत्पत्ती झाल्याचे काही प्राथमिक पुरावेही आढळून आलेत. जगभरामध्ये आतापर्यंत १७ लाखांहून अधिक जणांचा ज्या कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे

वटवाघुळांवर संशोधन करणारी एक तुकडी नुकतीच या ठिकाणी पोहचली होती. मात्र त्यांनी गोळा केलेले अनेक नमुने चीन सरकारने जप्त केले आहेत. यासंदर्भातील माहिती या प्रकरणाशी संबंधित दोन सुत्रांनी दिलीय. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एसोसिएट प्रेसच्या पत्रकांच्या गाड्यांबरोबरच इतर अनेक गाड्यांचा पाठलाग करुन त्यांना या ठिकाणी प्रवेश करण्यापासून थांबवलं.

कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त असोसिएट प्रेसने चीनमध्ये शोध पत्रकारितेअंतर्गत या विषाणूचा उगम नक्की कोणत्या क्षेत्रात झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी कोरोना विषाणूची उत्पत्ती कोठे झाली आहे यासंदर्भातील सर्व माहितीवर आणि त्याच्याशी संबंधित सुत्रांवर चीन सरकारचे नियंत्रण असल्याचे या गटातील पत्रकारांना दिसून आलं. इतकचं नाही तर कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनमध्ये झाली नसून इतर ठिकाणी झाली आहे असा दावा करणाऱ्यांना चीन प्रोत्साहन देत असल्याचेही या तपासामध्ये दिसून आलं. चीनमधील कोरोनासंदर्भातील सर्व संशोधनावर सरकारचे नियंत्रण असून यासंदर्भात कोणती माहिती सार्वजनिक करावी आणि कोणती नाही यावरही सरकारचेच नियंत्रण आहे.

कोरोनासंदर्भात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांवर चीनमधील सरकारचं आणि तेथील सरकारी यंत्रणांच बारीक लक्ष आहे. चीनमध्ये नवीन संशोधनासंदर्भातील प्रबंध सार्वजनिक करण्याआधी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अंतर्गत येणाऱ्या मंत्रीमंडळाच्या समितीद्वारे परवानगी आणि सही शिक्का घेणं अनिवार्य असल्याचीही माहिती समोर आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांची नजर चुकवून काही सुत्रांनी उपलब्ध करुन दिलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक अशी अप्रकाशित माहिती मिळाली आहे. या कागदपत्रांमधून बरीच धक्कादायक माहिती समोर आली असून मागील बऱ्याच काळापासून जी भीती व्यक्त केली जात होती त्याचे संकेत या कागदपत्रांमधून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

चिनी तसेच परदेशी संशोधक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यांबरोबरच सार्वजनिक पत्रके, गोपनीय इमेल्स, चीनमधील इतर काही सरकारी कागदपत्रांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्र प्रकाशित करण्यात आलेली नाही. कोरोनासंदर्भातील माहिती लपवणे आणि यासंदर्भात तातडीचे निर्णय घेण्याचे चीनचे धोरण यावरुन स्पष्ट होत आहे.

Protected Content