Home Cities भुसावळ मतदारांसोबत खासदार रक्षाताई खडसेंची होळी साजरी

मतदारांसोबत खासदार रक्षाताई खडसेंची होळी साजरी

0
27

भुसावळ प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षाताई खडसे यांनी आज प्रचाराच्या दरम्यान मतदारांसोबत होळी साजरी केली.

खासदार रक्षाताई खडसे यांनी जोरदार प्रचारास प्रारंभ केला आहे. विरोधी उमेदवार जाहीर होण्याआधीच त्यांनी मतदारसंघात संपर्क मोहिम सुरू केली आहे. दरम्यान, आज देशभरात सर्वत्र होळीचा जल्लोष असतांना रक्षाताईंनी आपल्या मतदारांसोबत होळी उत्सव साजरा केली. याप्रसंगी नाथाभाऊ आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विविध गावांमध्ये महिलांनी रक्षाताईंचे स्वागत करून त्यांच्यासोबत रंग खेळून होळीचा आनंद घेतला. यामध्ये त्यांनी राजुरा, हिवरा, जोंधनखेडा, उमरा या गावांतील आदिवासी बांधवांसमवेत पारंपारिक पद्धतीने आणि विविध गावात गावकर्‍यांसमवेत धुलीवंदन साजरे केले. याप्रसंगी भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, भाजप तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound