रिपब्लिकन ऐक्यासाठी मंत्रिपद सोडायला तयार – आठवले

 

 

 

 

669917 athawale ramdas 071517 770x433

महाड (वृत्तसंस्था) रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार असतील तर त्यांनी रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्ष व्हावे, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

महाड चवदार तळे सत्याग्रहावेळी सनातनी विरोधकांनी सत्याग्रहींवर दगडफेक केली, हल्ले केले. रक्तबंबाळ होऊन सत्याग्रही भीमसैनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे येऊन प्रतिहल्ला करण्याची परवानगी मागू लागले, तेंव्हा डॉ. आंबेडकरांनी त्यांना हिंसेचे उत्तर हिंसेने देऊ नका असे बजावले, असे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.
समाजात विनाकारण तेढ निर्माण करणे योग्य नाही. मागसावर्गीयांसह सवर्ण सर्व समाज एकत्र आला पाहिजे. भारतीय दलित पँथरच्या शाखा स्थापन करताना मी सांगत होतो की, सवर्ण समाजाविरुद्ध दलित पँथर नाही. समाजात समता निर्माण झाली पाहिजे यासाठी मी काम करीत असून समाजिक ऐक्यासाठी आपण शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र केली. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी मी पहिली मागणी केली होती, असा दावाही रामदास आठवले यांनी केला.
काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून भांडणे लावत आहेत, असा आरोपही आठवले यांनी केला. मी मात्र दोन समाजातील वाद मिटवितो. आपसात संघर्ष करणे योग्य नाही. अंतर्गत लढण्यापेक्षा पाकिस्तानला आम्ही धडा शिकवू असेही आठवले यावेळी म्हणाले.

Add Comment

Protected Content