महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या उपाध्यक्षपदी डॉ. नारायण खडके यांची निवड

 

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे २०२० ते २०२४च्या मुदतीसाठी अध्यक्षपदी ऑलिंपियन व अर्जुन पुरस्कार विजेता आदिल सुमरिवाला, सचिवपदी सतीश उचिल, खजिनदारपदी माधव शेजुळ, अॅड. अभय छाजेड हे चेअरमनपदी बिनविरोध निवडून आले. तर संघटनेच्या उपाध्यक्षपदी जळगावचे डॉ. नारायण खडके तर संचालकपदी राजेश जाधव यांची निवड करण्यात आली.

दि. १ डिसेंबर रोजी महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या कार्यकारणी सभेमध्ये २०२० ते २०२४ याकालावधीसाठी निवडणूक घेण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता. सदर निवडणुकीसाठी सुनील शिंदे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या मार्फत ७ डिसेंबरपर्यंत प्रतिनिधींची नावे मागविण्यात आली. डिसेंबर ८ रोजी पात्र सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. ९ ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत पात्र यादीतून नामनिर्देशन पत्र मागवण्यात आल्या. १८ डिसेंबरपर्यंत माघारीचा कालावधी होता. या कालावधीत निर्देशित पदांपेक्षा जास्त उमेदवार न आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक अधिकारी सुशील शिंदे यांनी कळविले.

आज २० डिसेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घटनेप्रमाणे निवडून आलेल्या कार्यकारणीची नवे जाहीर करण्यात आली. यात ऑलिम्पियन ललिता बाबर, रचिता मिस्त्री, आनंद मेनेझिस व होमियार मिस्त्री आणि गुरबन्स कौर यांच्यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी घटनेनुसार विविध अनिवार्य समित्यांचे अध्यक्ष म्हणून कामगिरी देऊन या परिषदेचा एक भाग बनविला आहे. याप्रसंगी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे प्रतिनिधी मधुकांत पाठक तर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

Protected Content