चोरासह मोटरसायकल विकत घेणारा अटकेत –

 

रावेर : प्रतिनिधी । चोरीची मोटारसायकल विकत घेणारांसोबतच ती चोरणारा चोरही पोलिसांनी आज पकडला .

फिर्यादी शेख आसिफ शेख सुभान (वय 24, रा. – नेहता , ह . मु. मदिना कॉलनी रावेर) हे एकता दूध डेरीमध्ये कामाला असून त्यांची मोटरसायकल बजाज बॉक्सर ( क्र एम एच १९ आर ५९०८) ही एकता दूध डेरीच्या मागे लावलेली होती. ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने त्यांनी काल ( दि 19.) फिर्याद दिली त्यावरून गुन्हा 244/2020 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला .

तपासात गुप्त बातमी द्वारा मार्फत माहिती काढून आरोपी अब्दुल जुबेर अब्दुल रौफ ( रा.रावेर गौसिया मशिद बंडू चौक ) यानेच चोरल्याची माहिती मिळाल्याने त्यास अटक करून विचारपूस केल्यावर त्याने नमूद गुन्ह्याची कबुली दिली मोटरसायकल त्याने रसलपूर कुरेशिवाडा वाडा येथे राहणार शे सादिक निसार कुरेशी यास फक्त 3000/-रुपयात विकलेची कबुली दिल्याने चोर व विकत घेणार यास अटक केली भा द वि कलम ४११ वाढविण्यात आले, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राठोड यांचे समक्ष हजर केले असता एक दिवस एक दिवसाची ओलीस कोठडी मिळाली
या आरोपीने आणखी किती मोटर सायकल चोरल्या आहेत व कोणकोण साथीदार आहे याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना महेंद्र सुरवाडे, पो कॉ मंदार पाटील, सुरेश मेढे, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, विशाल पाटील व कुणाल सोनवणे करीत आहेत

Protected Content