जळगाव प्रतिनिधी । येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविद्यालयातील प्रा. विनोद महाजन यांची नुकतीच विप्रो प्रमाणित प्राध्यापक म्हणून निवड झाली आहे.
विप्रो कोर्पोरेशन ही उद्योग समूहातील सर्वात मोठी कंपनी असून मागील काळात शैक्षणिक संस्थेतील प्राध्यापकांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने भारतातील काही निवडक प्राध्यापकांसाठी तीन आठवड्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेतील शेवटच्या सत्रात झालेल्या परीक्षेत रायसोनी इन्स्टिट्यूटचे प्रा. विनोद महाजन यांनी उत्तम गुण मिळवल्याने त्यांची विप्रो प्रमाणित प्राध्यापक म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रा. महाजन यांची निवड झाल्याने रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व बिझनेस मेनेजमेंट महाविद्यालयाचे डीन प्रा.डॉ.ए.जी. मॅथ्यू यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.