Home Cities एरंडोल शिक्षक किशोर पाटील कुंझरकरांचा आढळला मृतदेह; घातपाताचा संशय

शिक्षक किशोर पाटील कुंझरकरांचा आढळला मृतदेह; घातपाताचा संशय

0
73

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

येथील राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह पळासदळ शिवारात आढळून आला आहे. किशोर पाटील हे गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. काल सायंकाळी ते घरी परत आले नाही. रात्री त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

किशोर पाटील हे प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या सौभाग्यवती या देखील शिक्षिका आहेत. किशोर पाटील यांचा मृतदेह हा संशयास्पद स्थितीत आढळून आला असून त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


Protected Content

Play sound