जळगाव प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे रविवारी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात सकाळी १० वाजता कवि संमेलन होणार आहे. याच्या अध्यक्षस्थानी कवी मुश्ताक करिमी तर उदघाटन म्हणून व्हीएनआयटी नागपूर येथील प्रा. डॉ. श्रीराम सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत.
या कविसंमेलनास मनपा शिक्षण सभापती सचिन पाटील, प्राचार्य डॉ. अनिल लोहार, डॉ. मिलिंद बागूल यांची उपस्थिती असेल. यात डॉ. प्रदीप सुरडकर, राहुल निकम, राजेंद्र पारे, भास्कर चव्हाण, प्रल्हाद खरे, दिलीप सपकाळे, गोविंद देवरे, किशोर नेवे, अशोक पारधे, प्रफुल्ल पाटील, पुष्पा साळवे, मंगल पाटील, आर. डी. कोळी, विजय लल्हे, अरुणकुमार जोशी, गोविंद पाटील आदी कवि आपापल्या कविता सादर करणार आहेत. रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.