बनावट प्रॉडक्ट तयार करणाऱ्या दोघांवर छापा; ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नेहरू नगरात दोन जण बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करणाऱ्यांवर एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी सुमारे ७ लाख ५ हजार ७४५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नेहरू नगर व गायत्री नगरातील दोघेजण वेगवेगळ्या कंपनीच्या ओरीजनल प्रॉडक्ट सारखे बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करत असल्याची गोपनिय माहिती कंपनीचे फिल्ड अधिकारी सिध्देश शिर्के यांना समजली. त्यानुसार त्यांनी पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांची भेट घेवून कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बुधवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता छापा टाकला. यात नेहरू नगरात राहणारा जयप्रकाश नारायणदास दारा आणि गायत्री नगरातील आकाश राजकुमार बालानी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून सुमारे ७ लाख ५ हजार ७४५ रूपये किंमतीचा झेंडूबाम, इनो सिक्सर, आयोडेक्स बाटल्या, हार्पीक पावर, डेटॉल साबन, शैंपूच्या पुड्या, सर्फ एक्सलचे पााऊच असा बनावट मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.  कंपनीचे फिल्ड अधिकारी सिध्देश शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जयप्रकाश नारायणदास दारा आणि आकाश राजकुमार बालानी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.

यांनी केली कारवाई

जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या सुचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचिन मुंढे, पो.ना. योगेश बारी, सचिन पाटील, विशाल कोळी, राहूल रगडे, छगन तायडे, महिला पोकॉ राजश्री बाविस्कर यांनी कारवाई केली.

 

Protected Content