यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहीगाव येथील रहिवाशी शांताराम देवचंद पाटील (वय-६३) हे शेतकरी असून शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीए ४८७७) आहे. सोमवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते दुचाकीने तालुक्यातील सावखेडा शिवारात असलेल्या त्यांच्या शेतात गेले. दुचाकी पार्कींग करून ते कामाला निघून गेले. दुपारी १ वाजता दुचाकी जागीवर दिसून आली नाही. तसेच सर्वत्र शोध घेतले असता मिळून आली नाही. मंगळवारी दुपारी यावल पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार केली. यावल पोलीस ठाण्यात शांताराम पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. सिकंदर तडवी हे करीत आहे.