चाळीसगाव शहरातून अज्ञाताने लांबवली दुचाकी

चाळीसगाव, प्रतिनिधी |  शहरातील कॅनेरा बॅंकेसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

 

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील दत्तवाडी येथील दुर्गेश आण्णा गवळी (वय-३०) यांनी शहरातील  कॅनेरा बॅंकेसमोर उभी केलेली दुचाकी (क्र. एम.एच.१९ बीपी ०२७७) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास उघडकीला आली. त्यावर दुर्गेश आण्णा गवळी यांनी आजपावेतो परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र २२ हजार रुपये किंमतीच्या हिरो होंडा प्लस कंपनीची मोटारसायकल मिळून आली नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर दुर्गेश आण्णा गवळी यांनी लागलीच चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून फिर्याद दिली असता भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस नाईक भुषण पाटील हे करीत आहेत..

Protected Content