अंतूली गावातून दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली येथील दाणी वाड्यातील राहत्या घरासमोर दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अंतूर्ली येथील रहिवाशी दिपक हेमराज महाजन (वय-४१) हे शेतकरी आहे. शेतीच्या कामानिमित्ताने त्यांच्याकडे (एमएच १९ व्ही ३६९९) क्रमांकाची दुचाकी आहे. गावातील दाणी वाड्यातील मनोज वाणी यांच्या घरासमोर नेहमीप्रमाणे २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता त्यांनी दुचाकी पार्किंगला लावली. सकाळी दुचाकी जवळ गेले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी नातेवाईक आणि मित्रांशी संपर्क साधला असता त्यांना दुचाकीची कोणतीच माहिती मिळाली नाही. दिपक महाजन यांनी मुक्ताईनगर पोलीसात धाव घेवून अज्ञात व्यक्तीविरोधात दुचाकी चोरी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. दिपक महाजन यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष चौधरी करीत आहे.

Protected Content