रावेर प्रतिनिधी । कत्तलसाठी २१ बैलांना आयशरमध्ये कोंबून घेऊन जाण्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील कर्जोद फाट्याजवळ शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एमपी ०८ : जीए-१६७९ या क्रमांकाचे आयशर वाहन रावेर पोलिसांच्या पथकाने जप्त केले. यात २१ बैलांना अतिशय दाटीवाटीने कोंबून भरण्यात आले होते. यातील अनेक बैल हे जखमी अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी हे वाहन व बैलांना जप्त केले. यातील बैल हे पोलीस कर्मचारी सुरेश मेढे यांच्या माध्यमातून जळगाव येथील बाफना गो-शाळेमध्ये पाठविण्यात आले आहेत. तर आयशयरचा चालक हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
या प्रकरणी रावेर पोलीस स्थानकात भाग ५ गु र न-२२२/२०२० कलम-भा द वि क ४२९ सह महा पशु संवर्धन अधि ५(अ)(ब),९ सह महा. पशुक्रृरता अधि.११(१)(ए)(एफ)(एच)(के)(आय) सहकलम-मु पो का-११९ सहकलम-महा.मोटर वाहन अधि.८३/१७७,सहकलम-पशु वाहतुक अधि.-४७,४८,४९(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. नितीन डांबरे हे करीत आहेत.