आसोदा रेल्वेगेटजवळ कुजलेला मृतदेह आढळला; तालुका पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । शहरातपासून जवळ असलेल्या आसोदा रेल्वेगेटच्या परिसरात अनोळखी प्रौढाचा मृतदेह आज १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

तालुका पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव आसोदा रोडवरील आसोदा रेल्वेगेटच्या परिसरात आज गुरूवार १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चारीत अनोळखी ४० ते ४५ वर्षे वयोगटातील  प्रौढ व्यक्तीचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. दरम्यान, गेल्या दहा दिवसांपुर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती जाणून घेतली. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी हाडांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ बापु कोळी करीत आहे.

Protected Content