Home Cities जळगाव महापरिनिर्वाणदिनी घरीच अभिवादन करा- जिल्हाधिकारी

महापरिनिर्वाणदिनी घरीच अभिवादन करा- जिल्हाधिकारी

0
30

जळगाव । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी न करता घरीच थांबून अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

कोविड १९मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे आयोजित कार्यक्रमाबाबत राज्य शासनाच्या गृहविभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येताहेत. यामुळे कोविडच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर येथील महापरीनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व अनुयायींनी चैत्यभूमी येथे न जाता घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.


Protected Content

Play sound