पारोळा प्रतिनिधी- राष्ट्रीय महामार्ग सहावर कजगाव नाक्याजवळ ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकल स्वार हा ठार झाल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलीस ठाण्यात ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे कडून जळगाव कडे जाणार ट्रक(ट्रेलर) क्रमांक जि जे12 बी डब्ल्यू 8073 हिने पुढे चालणारी मोटारसायकल क्रमांक एम एच 19 बी एल 7637 हिस मागून धडक दिली. धडकेत मोटारसायकल स्वार विजय धर्मा बडगुजर (वय 22 रा हिंगलाच माता मंदिर) हा गंभीर जखमी झाला. रस्त्यावरील नागरिकांनी त्याला उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले. डॉ योगेश साळुंखे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत भाऊ सुनील बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून ट्रक चालक नाव गाव माहीत नाही. या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत विजय हा वाहन चालक होता. तर त्याचे कुटुंबाचे दूध विक्री व्यवसाय आहे. घटनेने त्याचा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.