नवप्रसुत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

dead ..........

जळगाव प्रतिनिधी । प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्रावाने अत्यवस्थ झालेल्या विवाहितेची उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, अनिता बन्सीलाल बारेला (वय-२४) रा. देवझिरी ता. चोपडा यांनी आठ दिवसांपुर्वी मुलीला जन्म दिला. त्यांची प्रसुती घरीच झाल्याने नार्मल झाली होती. मात्र सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती ढासाळली. तातडीने चोपडा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी यांनी प्रकृती अधिक खालावल्याने त्यांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्याचा सल्ला दिला. रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मयत महिलेचे पती बन्सीलाल देवसिंग बारेला हे हातमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान हे त्यांचे तिसरे अपत्य असून प्रसुती घरीच करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, २ मुलगी व पती असा परीवार आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content