Home Cities भुसावळ फरार आरोपी निघाला मयत; मनमाड पोलीसात दाखल होता गुन्हा

फरार आरोपी निघाला मयत; मनमाड पोलीसात दाखल होता गुन्हा


 

भुसावळ प्रतिनिधी । गेल्या 26 वर्षांपासून फरार असलेला आरोपी मयत झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत माहिती अशी की, मनमाड पोलीस स्टेशनला गु.र.नं. 227/1993 प्रमाणे आरोपी नासरतसिंग तेजसिंग गिल रा. भुसावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून नासरतसिंग हा फरार होता. याबाबत मनमाड शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आर.पी.गलांडे यांनी तपासाचे पथक रवाना केले होते.

 

आज भुसावळ शहर पोलीसांकडे चौकशी केली असता फरार आरोपी नासरतसिंग तेजसिंग गिल यांचे निधन झाल्याचा दाखला मनमाड पोलीस पथकाला दिले. यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुनील जोशी, पो.ना. रविंद्र बिऱ्हाडे, पो.कॉ. विकास सातदिवे, अक्षय चव्हाण अशींनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound