नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीने दहशतवादी मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला. व्हिटो पावरचा वापर करुन चीनने मसूद अजहरचा प्रस्ताव रोखून धरला. त्यामुळे चीनच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली. मात्र आता चीनने मसूद अजहर प्रकरणावर लवकरच तोडगा काढू, या प्रस्तावाला आम्ही विरोध केला नसून आम्ही यावर चर्चा करत आहोत असं सांगितले.
भारतामधील चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांनी सांगितले की, मसूद अजहर प्रकरण चीन लवकर तोडगा काढेल, हे प्रकरण तांत्रिक आहे आणि आम्ही मसूज अजहर प्रकरणावर चर्चा करत आहोत. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही लवकरच हे प्रकरण सोडवणार आहे. मसूद अजहरबाबत भारताकडून व्यक्त होत असलेली चिंता आम्हाला माहिती आहे असं त्यांनी सांगितले.