ब्लॅक होलचे जगातले पहिले छायाचित्र खास ‘लाईव्ह ट्रेंड्स’च्या युजर्ससाठी !

WhatsApp Image 2019 04 11 at 15.41.08

पॅरिस (वृत्तसंस्था) जगभरातील खगोल प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे खगोल शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाने सिद्ध केलेल्या कृष्ण विवर अर्थात ब्लॅक होलच्या अस्तित्वाचा पुरावाच आता उपलब्ध झाला आहे. जगातला ब्लॅक होलचा पहिला फोटो नुकताच शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केला आहे. ब्लॅक होलमधून गॅस आणि प्लाजमाच्या नारंगी रंगाचा प्रकाश बाहेर पडताना या फोटोत स्पष्ट दिसत आहे. खगोल शास्त्रज्ञांनी ब्रसल्ज, शांघाय, टोकियो, वॉशिंग्टन, सँटियागो आणि तैपेई येथे एकाचवेळी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती जाहीर केली. पृथ्वीपासून  पाच कोटी प्रकाशवर्षे एवढ्या अंतरावर असलेल्या एम -८७ या नावाच्या आकाशगंगेतल्या सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल हे छायाचित्र आहे. मानवी जीवनाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे ब्लॅक होलचे प्रत्यक्ष छायाचित्र घेणे शक्य झाले आहे.

 

भारतीय प्रमाण वेळेनुसार काल सायंकाळी ६.०० वाजता हे फोटो जारी करण्यात आले आहेत. इव्हेंट होरायझन टेलिस्कोप या मोहिमेअंतर्गत खगोल शास्त्रज्ञांनी हवाई, अॅरिझोना, स्पेन, मेक्सिको, चिली आणि दक्षिण ध्रुव आदी सहा ठिकाणी इव्हेंट होरायझन टेलिस्कोप लावल्या होत्या. त्यातून हे फोटो घेण्यात आले आहेत. या फोटोतून मानवी कल्पनेला आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या स्पेसटाइम फॅब्रिकच्या रहस्याचा, विकृत क्षेत्राच्या आकाराचा खुलासा होण्याची शक्यता असल्याचं सांगितले जात आहे. या फोटोंमुळे सायन्स-फिक्शन सिनेमे बनविण्यासही प्रेरणा मिळणार असून येणाऱ्या पिढीला संशोधनासाठीही हे फोटो उपयुक्त ठरणार आहेत. ब्लॅक होल हे विश्वातील सर्वात मनोरंजक आणि रहस्यमय गोष्टींपैकी एक आहे. ब्लॅक होलच्या अतुलनीय गुरुत्वाकर्षणाची कल्पना ही भौतिकशास्त्राबद्दलची आपली समज खरी ठरवणारी आहे. परंतु मानवानी आजपर्यंत खरोखरचे ब्लॅक होल पाहिले नव्हते. नासा आणि इतर वैज्ञानिक संस्थांकडून आपण पाहिलेल्या सर्व प्रतिमा केवळ कलाकारांच्या मदतीने तयार केलेली कल्पना आहेत. तरीही त्यापैकी बऱ्याच प्रतिमा ह्या वास्तविक टेलीस्कोपमधील डेटावर आधारित आहेत.

वरीलपैकी नासाच्या चंद्रा एक्स-रे टेलिस्कोपद्वारे एकत्रित केलेल्या डेटावरून हे दिसून येते की, इव्हेंट होरायझन किंवा ब्लॅक होलच्या परिमितीवर असलेल्या अति-गरम पदार्थाचा शोध घेण्यात सक्षम आहे. परंतु ब्लॅक होलची थेट प्रतिमा प्रत्यक्ष मिळविण्यासाठी किंवा त्याच्याकडे आकर्षित केलेल्या उज्ज्वल सामग्रीच्या सावलीची छायाचित्र काढण्यासाठी काही गंभीर सहयोगी अभियांत्रिकी उपकरणांची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने ईएचटी हा जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशातून रेडिओ टेलिस्कोपचा एक नेटवर्क आहे, ज्याला पृथ्वीच्या आकाराचे खूप मोठे बेसलाइन इंटरफेरोमीटर म्हटले जाते. येथे मूलभूत कल्पना अशी आहे की, वेगवेगळ्या ठिकाणी रेडिओ टेलिस्कोपने डाटा घेऊन त्यांच्या शक्तीला चालना देण्यासाठी त्यांचे सिग्नल एकत्रित केले जातात. यासाठी ग्रहाच्या आकाराची वेधशाळा आवश्यक असते. ईएचटीच्या वेधशाळांच्या संघटनेमधे चिली, हवाई, अॅरिझोना, मेक्सिको, स्पेन आणि दक्षिण ध्रुवातील टेलिस्कोपचाही समावेश आहे. सर्व डेटा अचूकपणे एकत्रित करण्यासाठी अनेक पेटा बाईट डेटा एकत्रित केला गेला. त्यानंतर ब्लॅक होलची प्रथम प्रतिमा तयार करण्यासाठी सुपर कंप्यूटरची मदत घेण्यात आली आहे. या उपक्रमातून मानवाने अंतराळ संशोधनाचा आणखी एक महत्वाचा टप्पा सर केला आहे.

Add Comment

Protected Content