जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील बांधकाम मजूराने घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रदीप सदाशिव महाजन (वय-३२) रा. कळमसरे ता.अमळनेर ह.मु. संत मिराबाई नगर पिंप्राळा हे आपल्या पत्नी व मुलगासह वास्तव्याला आहे. बांधकामच्या ठिकाणी मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कामाच्या निमित्ताने गेल्या तीन ते चार वर्षांपासून जळगावला स्थायिक झाले होत. दिवाळीनिमित्त पत्नी माहेरी गेल्या होत्या. प्रदीप महाजन हे घरात एकटे असतांना घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा घटना शेजारच्यांच्या लक्षात आल्याने घटना उघडकीस आली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतेदहाचा पंचनामा केला. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.कॉ. शिवाजी धुमाळ करीत आहे.