यावल प्रतिनिधी । तालुक्यातील परसाडे गावात आदिवासी समाज बांधवांच्या वतीने नुकतीच क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.
(दि.१५) नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाचे दैवत भगवान बिरसा मुंडा या आद्यक्रांतिकारक नेत्यांची जयंतीनिमित्त येथील परसाडे ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय जयंती साजरी करण्यात आली असून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन यावल तालुका कॉग्रेस सेलचे बशीर तडवी, आदिवासी समाजातील केंद्रीय आदर्श पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक मजित अरमान तडवी तसेच अय्युब तडवी, सलीम तडवी बाबासाहेब भालेराव राजू तडवी, सुलेमान तडवी, अमित तडवी व यासह मोठया संख्येत आदिवासी बांधव या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांनी भगवान बिरसा मुंडा यांनी आदीवासी बांधवांसाठी केलेल्या अस्मणीय कार्याचा उल्लेख आपल्या मार्गदर्शनातुन केले. त्यांनी आदिवासी समाजासाठी केलेले कार्य कधीही विसरू शकत नाही, अश्या आदिवासी क्रांतिकार यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करीत आहोत.