Home क्राईम ट्रक आणि इर्टिका कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ ठार

ट्रक आणि इर्टिका कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ ठार


accident beed

अहमदनगर (वृत्तसंस्था) अहमदनगर-जामखेड रोडवर ट्रक आणि इर्टिका कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार झाले आहे. आज पहाटे चारच्या सुमारास बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पोखरी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला.

 

भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि इर्टीका कारची समोरासमोर टक्कर होऊन हा भीषण अपघातात झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका सात वर्षीय मुलाचा समावेश आहे. मृतांमध्ये नागेश चमकुरे चालक, योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे (वय ७ वर्षे), अनिकेत चमकुरे यांचा समावेश आहेत. सर्वजण नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सावरगाव पिरजादे येथील रहिवाशी असल्याचे कळते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound