जागतिक आरोग्य संघटनेकडून मोदींचे आभार

 

लंडन : वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी कोरोनाविरोधातील भारत देत असलेल्या लढ्याबद्दल कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Covax लस आणण्यासाठी दाखववेली कटिबद्धता आणि जगभरात ती उपलब्ध करुन देण्यासाठी दाखवलेल्या कटिबद्धतेबद्दल ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी स्तुती केली आहे.

ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी ट्विटरवर मोदींचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “Covax लस तसंच ती जगभरात उपलब्ध करुन देण्यासाठी दाखवलेल्या कटिबद्दततेबद्दल मी नरेंद्र मोदीचे आभार मानतो. जगासाठी कोरोना महामारी मोठं आव्हान असून ती संपवण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्यावर आमचं एकमत झालं आहे”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांच्यावर फोनवर चर्चा पार पडली. या चर्चेत जागतिक स्तरावर उपाययोजना, संशोधन आणि पारंपरिक औषधांचा अभ्यास यावर भारत आणि जागतिक आरोग्य संघटनेने एकत्र काम करण्यावर चर्चा झाली. ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी ट्विटमध्ये जागतिक आरोग्य तसंच युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजमध्ये भारताच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर जागतिक आरोग्य संघटनेचं महत्व अधोरेखित केलं. मोदींनी चर्चेदरम्यान इतर रोगांकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये याकडे लक्ष वेधताना जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळात असलेल्या पाठिंब्याचं महत्व सांगत कौतुक केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांना भारत १३ नोव्हेंबर रोजी भारतात आयुर्वेद दिवस साजरा करण्याची योजना आखत असल्याची माहिती दिली.

Protected Content