भुसावळ गोळीबार : गावठी कट्टा पुरवणारा आरोपी अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । येथील गोळीबार प्रकरणात गावठी कट्टा पुरविणार्‍या आरोपीला नांदुरा येथून अटक करण्यात आली आहे. यामुळे आता या प्रकरणात नऊ आरोपी गजाआड झाले आहेत.

शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरुणावर गोळी झाडून फायटरने मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ चाळीस वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुरुन. ३७७/२०२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ह्या गुन्ह्यातील गावठी कट्टा पुरविणार्‍या आरोपी नांदुरा असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथक व बाजारपेठचे कर्मचारी गुन्ह्यातील फरार आरोपीच्या शोधकामी नांदुरा येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेऊन रात्री उशिरा नवव्या आरोपीस शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

फिर्यादी आदित्य संजय लोखंडे (वय-१९ न्यू आंबेडकर नगर,भुसावळ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार भूषण सपकाळे याने फोन करून बोलावून कब्रस्थान जवळ घेऊन गेला. त्या ठिकाणी अतिष खरात, हंसराज, गोलू उर्फ राजन खरात,चिन्न,सूरज, गोविंदा,कपिल कासे,राहुल धम्मा सुरवाडे यांनी मिळून फायटरने तसेच चापट्या बुक्यांनी मारहाण केली.तसेच गावठी कट्ट्याने गोळीबार करून गोळी तरुणाच्या कानाला, डोक्याला लागली असून तरुणाच्या हातालाही दुखापत झाली आहे. यातील गुन्ह्यात पुरविण्यात आलेल्या गावठी कट्ट्या बाबतचा फरार (नववा) आरोपी सचिन भीमराव वाघ (वय २८ राहणार भुसावळ ह.मु.नांदुरा जिल्हा बुलढाणा) मध्ये असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळाली होती. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखाचे पोकॉ.रविंद्र पाटील,कमलाकर बागुल,दादाभाऊ पाटील, दिपक चौधरी वाहन चालक तसेच बाजारपेठचे पोकॉ विकास सातदिवे यांनी नांदुरा जाऊन आरोपीस ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणले. तसेच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी यांच्या ताब्यात दिले.

Protected Content