Home Cities चोपडा धानोरा विद्यालयाचा 93.16 टक्के निकाल ; गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

धानोरा विद्यालयाचा 93.16 टक्के निकाल ; गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

be5e0708 8353 4232 b5e8 c0abbd07ee10
be5e0708 8353 4232 b5e8 c0abbd07ee10

be5e0708 8353 4232 b5e8 c0abbd07ee10

धानोरा ता.चोपडा (प्रतिनिधी) येथील झिपरू तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील ज्युनिअर कॉलेजचा 12 वीचा निकाल 93.16 टक्के लागला आहे. विद्यालयातून निकिता गोकुळ साळुंखे हिने 76 टक्के मिळवीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. जागृती रवींद्र पाटील हिने 74.69 तर मनीषा लहू बाविस्कर हिने 73.69 टक्के मिळवीत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.

 

आज या तिन्ही विद्यार्थिनींचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी.एस. महाजन, चेअरमन सुखदेवराव पाटील, शालेय समिती सदस्य वामनराव महाजन, प्रदीप महाजन, माजी चेअरमन नामदेवराव पाटील, सत्तपंथ ज्योत मंदिराचे अध्यक्ष बाजीराव पाटील, प स चे माजी उपसभापती माणिकचंद महाजन, व्हि.सी.पाटील, सल्लागार समिती सदस्य योगेश पाटील, तुकाराम महाजन, पालक गोकुळ साळुंके, रवींद्र पाटील, लहू कोंळी, प्रा. रेखा महाजन, प्रा.एस.सी. पाटील , क्रीडा शिक्षक देवीदास महाजन, वासुदेव महाजन,एस.एस.पाटील, मच्छिंद्र महाजन, दिगंबर सोनवणे, डी.व्हि.पाटील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound