यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील बालसंस्कार शिक्षण मंडळ संचलित बालसंस्कार माध्यमिक विद्यालय यांचा इयत्ता दहावीचा निकाल तब्बल ९१.०४% लागून ६७ विद्यार्थ्यांपैकी ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
विद्यालयात प्रथम आलेली विद्यार्थीनी खुशी सुनिल बारी हिने ९५.००% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. दुसऱ्या क्रमांकावर सोनाली धनंजय उंबरकर हिने ९३.८०%, तर तिसऱ्या क्रमांकावर योगेश विकास फालक याने ९०.६०% गुण मिळवत टॉप थ्रीमध्ये स्थान पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे संस्थाध्यक्ष महेश वाणी, संचालक मंडळ, मुख्याध्यापक ए.एम. गर्गे, उपशिक्षक एल.व्ही. चौधरी, एन.ए. बारी, एस.डी. देशमुख, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, पालक व हितचिंतकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
विद्यालयाच्या यशामागे शिस्तबद्ध अध्यापन, विद्यार्थ्यांचा परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य हे घटक असल्याचे मुख्याध्यापक गर्गे यांनी सांगितले. पुढील वाटचालीसाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.