पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्याने मतदार संघातील गावांसाठी ९० लाख रुपयांचा निधी दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला आहे. सदर विकासकामांना प्रशाकीय मान्यता प्राप्त झाली असून, विकासकामे तातडीने करण्यात येणार आहे.
मंजूर विकासकामे पुढील प्रमाणे आहेत.
पाचोरा तालुका – नगरदेवळा येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), माहेजी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), पिंपळगाव हरेश्वर येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), शिंदाड येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), वरखेडी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), गाळण बु येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), तारखेडा बु येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), तारखेडा खु येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष),
भडगाव तालुका – आडळसे येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), जुवार्डी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), पेडगाव येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), शिंदी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), वलवाडी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), महिंदळे येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (६ लक्ष), सावदे येथे दलितवस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (७ लक्ष), कोळगाव येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (६ लक्ष), पिंप्रीहाट येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (६ लक्ष).
दरम्यान आमदार किशोर पाटील यांनी “जे शेतकरी कर्जमाफी योजनेपासुन वंचित राहिलेले आहेत” त्यांना तत्काळ कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा, तसेच पाचोरा भडगाव मतदारसंघामधील शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे तसेच दुष्काळी अनुदान व वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, यासह मतदार संघातील इतर विकास कामांबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करुन त्यांना निवेदन दिले आहे.