विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या ४० वर्षीय विवाहितेला मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, भडगाव शहरातील एका भागात राहणारी ४० वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, संशयित आरोपी अमोल दगा पाटील आणि गणेश दगा पाटील दोन्ही रा. भडगाव यांनी महिलेच्या घरात बसून तिला लोखंडे सळईने हातावर बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यांचा हाताची करंगळी फॅक्चर झाले आहे तर एकाने शिवीगाळ करून ‘तू बाहेर भेट तुला उडवून देऊ’, अशी धमकी दिली तर यातील एकाने  महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेची महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी अमोल दगा पाटील, गणेश दगा पाटील यांच्या विरोधात भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पांडुरंग सोनवणे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!